BLOG - डॅशिंग नवरा, वत्सल पिता, अद्वितीय योद्धा अन् भोळा त्राता !

अनिकेत पेंडसे
सोमवार, 4 मार्च 2019

नवरा म्हणून डॅशिंग, पिता म्हणून वत्सल, योद्धा म्हणून अद्वितीय, त्राता म्हणून भोळा. मूळात शंकर देव वाटतच नाही कधी. प्रत्येक मानवी भाव-अनुभव-विचित्रपणा-भावना-रंग-राग ठासून भरलाय याच्यात! देव म्हणजे पूर्णत्व वगैरे असेल तर शंकर मला अपूर्ण वाटतो आणि तसाच आवडतो.

स्वत:च्या लूकची आणि इमेजची फारशी काळजी नाही, ना इन्द्रासन हवं ना अमरत्व. ना देवमहाल हवा ना मनमोहक रुप. कशाचीच लालसा नाही. कशाचीच भीती नाही. कशाचीच चिंता नाही. पण बेफिकीरही नाही. उलट विष पचवायची ताकद. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट शंकराशी निगडीत दोन शब्द. चिलिम आणि भांग. असं म्हणतात शंकराला चिलिम आणि भांग अर्पण केली की ही व्यसनं सुटतात. ऐकूनही विचित्र वाटतं. याच्यासाठी अवलिया हा शब्दही कदाचित अपुरा पडेल. पण काहीही असोत डॅशिंग हा शब्द उच्चारल्यावर माझ्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे शंकर.

परस्परविरोधी अनेक गुण-शैली-मात्रा (मानवीय) एकाच ठिकाणी वसणे म्हणजे शंकर! कदाचित संस्कृत साहित्याच्या अभ्यास करताना शंकराचं जे चित्र उभं राहिलं त्यामुळं शंकराची वर लिहिलेली प्रतिमा माझ्या मनावर कोरली गेलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live