महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 100 कैद्यांना विशेष माफी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 100 कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे. यास पात्र झालेले सर्वाधिक कैदी हे तळोजा येथील तुरुंगातील आहेत. शुक्रवारी  (ता. 5) या सर्व कैद्यांची सुटका होणार आहे.

तुरुंगातील कैद्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या कमी करण्याकरिता केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत आहे. किरकोळ गुन्ह्यांत शिक्षा झालेल्यांची संख्या अधिक आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली.

2 ऑक्‍टोबर 2018 पासून वर्षभरात तीन टप्प्यांत या कैद्यांची सुटका होणार आहे. यात तळोजा तुरुंगातील 42, येरवडातील 24, कोल्हापुरातील 9, नागपूरमधील 4 आणि मुंबई मध्यवर्ती आर्थर रोडमधील 3, ठाण्यातील 1, धुळ्यातील 1, अमरावती 2, वर्धा आणि औरंगाबादमधील प्रत्येकी 3 कैद्यांचा समावेश आहे.

WebTitle : marathi news mahatma gandhi jayanti special remission to hundred prisoners

संबंधित बातम्या

Saam TV Live