भाजपला गप्प ठेवण्यासाठी आघाडी वापरणार 'कॅग' अहवालाचे शस्त्र

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 मार्च 2020

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारला अर्थसंकल्पी अधिवेशनात कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षाचा डाव कॅगच्या अहवालावरून सैल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारला अर्थसंकल्पी अधिवेशनात कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षाचा डाव कॅगच्या अहवालावरून सैल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरूवात होउन आठवडा उलटला आहे. पहिल्या आठवडयात विरोधी बाकावरील भाजपने सत्ताधारी पक्षाला शेतकरी कर्जमाफी आणि सावरकर या दोन मुदयांवर कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीशे बॅकफुटवर गेल्याचे चित्र महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाले होते. त्यामुळे सलग तीन दिवस कामकाज पुर्ण क्षमतेने झाले नव्हते. मात्र, मंत्रीमंडळ बैठकीत कॅगच्या अहवालावर चर्चा होउन त्यामध्ये मागील सरकारच्या काही निर्णयावर कॅगने ठपका ठेवल्याच्या बातम्या माध्यमात आल्यावर विरोधी बाकावरील भाजपमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे समोर आले आहे.

 

VEDIO | NCPकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर

वाचा - https://www.saamtv.com/marathi-news-sharad-pawar-and-fauzia-khan-rajysabha-ncp-9712

 

कॅगच्या अहवालाचा वापर विरोधी पक्षाला काबूत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार नक्‍कीच करणार याबाबत राजकीय जाणकार तर्क लावत आहेत.अदयाप अर्थसंकल्प मांडावयाचा असून अधिवेशनाचा बराचसा कालावधी बाकी आहे. या दरम्यान विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधारी पक्ष कॅगचा अहवाल सभागृहात मांडून विरोधी पक्षाच्या आक्रमणातील धार बोथट करू शकतो, ही शक्‍यता वर्तवली जात आहे.

अर्थसंकल्प येत्या 6 तारखेला मांडला जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामुळे विरोधकांच्या हाती शेतकरी कर्जमाफी हा मुददा शिल्लक राहणार नाही. तसेच महिलावरील अत्याचाराबाबत या अधिवेशनात सखोल चर्चा करण्याचे आश्‍वासन या सरकारने दिल्यामुळे त्या मुदयावर विरोधकांना सत्ताधा-यावर तोंडसूख घेणे फारशे जमणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तरीही विरोधी पक्ष शिरजोर ठरण्याचे चित्र निर्माण झाले तर सत्ताधारी पक्ष कॅगचा अहवाल सभागृहात मांडून विरोधकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करेल, असे राजकीय भाकीत वर्तवले जात आहे.

Web Title - Marathi News Mahavikas aghadi may use cag against bjp


संबंधित बातम्या

Saam TV Live