महावितरण सोसतेय महिन्याला साडेतीनशे कोटींचा भूर्दंड 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

सोलापूर : महावितरणचा मासिक खर्च आणि वसुलीचे प्रमाण पाहता सध्या सुमारे 350 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे विश्‍वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती न सुधारल्यास महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या जिवनात अंधार होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. 

ग्रामीण व शहरी ग्राहकांना पुरेसा वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणीची राज्यात 40 हजार 144 कोटींची थकबाकी आहे. सध्या महावितरणचा वीजखरेदी, तारा, डीपी, ट्रान्फॉर्मरसह अन्य देखभाल-दुरूस्तीसाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च सोसवेना झालायं. नव्या विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज आता सुरू झाले आहे. त्याचा धसका आता कर्मचाऱ्यांनी घेतला असून त्यांना भविष्याची चिंता सतावू लागली आहे. 

वीजचोरी व वीज गळती या कारणांमुळे थकबाकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे महावितरणला कोट्यवधींचा भूर्दंड सोसावा लागत आहे. वापरलेल्या विजेचे पैसे ग्राहकांनी वेळेवर भरावेत व थकबाकी वसुलीसाठी शासनाने ठोस धोरण तयार करावे. 
- पी.एस.पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण 

  • आकडे बोलतात...   (मासिक खर्च) 
  • एकूण कर्मचारी  - 85,000 
  • वीज खरेदीचा खर्च - सुमारे 3240 कोटी 
  • वेतनावरील खर्च  - 155 कोटी 
  • देखभाल दुरस्तीचा खर्च - 980 कोटी 
  • इफ्रा 1 व 2 साठीचे कर्ज - 14000 कोटी 
  • कर्जावरील व्याज - 250 ते 275 कोटी 
  • सरासरी एकूण वसुली - 4,300 कोटी 
  • एकूण खर्च  - 4650 कोटी 
  • तफावत (तोटा) - 350 कोटी

संबंधित बातम्या

Saam TV Live