मेजर कौस्तुभ राणेंवर आज अंत्यसंस्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं.

बंदीपोरा येथे काल रात्री उशिरा शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास श्रीनगरहून दिल्लीला विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचं पार्थिव मुंबईतील घरी आणलं जाईल. 

29 वर्षीय शहीद मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली. 

WebTitle : MARATHI NEWS MAJOR KAUSHTUBH RANE LAST RITUALS IN MIRA ROAD 

संबंधित बातम्या

Saam TV Live