माळशेज घाटात कोसळली दरड.. माळशेज घाट 2 दिवसांसाठी राहणार बंद  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

माळशेज घाटात पहाटे दोन वाजता दरड कोसळल्याने माळशेज घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. दरड कोसळल्याने त्याचा परिणाम दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस माळशेज घाटात दरड हटवण्याचं काम सुरु असणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस माळशेज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.  पहाटे दोन वाजता माळशेज घाटातील दरड एका आयशर टेम्पोवर कोसळल्यामुळे टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय. अमोल दहिफळे असं या चालकाचं नाव असल्याचं समजतंय. त्याला पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आलंय. महामार्ग अधिकाऱ्यांकडून घटनास्थळावरील दरड हटवण्याचे काम सुरू आहे

Youtube Linkhttps://youtu.be/bPW1Ii4eYp8

WebTitle : marathi news malshej ghaat landslide maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live