'मोदी-शहा विरूद्ध ममता' संघर्ष टिपेला; मोदी विरोधकांचा ममतांना पाठिंबा 

'मोदी-शहा विरूद्ध ममता' संघर्ष टिपेला; मोदी विरोधकांचा ममतांना पाठिंबा 

अमित शहांच्या रोड शोवेळी कोलकात्यात राडा झाल्यानंतर ममता विरूद्ध मोदी-शहा संघर्ष टिपेला पोहचलाय. ममतांनीही रॅली काढत भाजपला आपली ताकद दाखवून दिलीय. दरम्यान मोदी विरोधकांनी मोठ्या संख्येनं ममतांना पाठिंबा दर्शवलाय.अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्रबाबू नायडू यांनी ट्विट करत ममतांना पाठिंबा दिलाय. तर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदी-शहांवर टीकेची झोड उठवलीय. 

  • लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच ममतांनी मोदी-शहांविरोधात रणसिंग फुकलं होतं. 
  • 72 तास धरणं आंदोलन करत त्यांनी आपण कुणालाही बधणार नाही हे दाखवून दिलं. 
  • इतकच नाही तर 19 जानेवारीला त्यांनी सराकारविरोधात संयुक्त रॅलीचं आयोजन केलं.
  • त्यात 22 विरोधी पक्षातले 44 मोठे नेते मंचावर हजर होते. 

यातून ममतांच्या नेतृत्वाची ताकद लक्षात येते. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला चंचुप्रवेशही करू द्यायचा नाही अशी भूमिका ममता बॅनर्जींनी घेतलीय. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही आघाडीला बहुमत मिळालं नाही तर विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जींच्या नावाचा विचार होऊ शकतो. ही शक्यताही नाकारता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com