घरी येण्यास दहा मिनिटे उशीर झाल्याने दिला तलाक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

आजारी असलेल्या आजीला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीला घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्यामुळे फोनवरून तलाक दिल्याची घटना येथे घडली आहे.

आजारी असलेल्या आजीला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीला घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्यामुळे फोनवरून तलाक दिल्याची घटना येथे घडली आहे.

पीडित महिलेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, माझी आजी आजारी असल्यामुळे तिला भेटण्यासाठी आईच्या घरी गेले होते. अर्ध्या तासामध्ये घरी परत यायचे असे माझ्या पतीने मला घरातून निघताना सांगितले होते. पण मला घरी यायला 10 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे पतीने माझ्या भावाच्या मोबाईलवर फोन करून तलाक, तलाक, तलाक एवढे म्हणून फोन ठेवला. या प्रकारामुळे मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. माझ्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मला अनेकदा मारहाण केली आहे. मारहाणीमुळे माझा एकदा गर्भपातही झाला आहे. माझ्या माहेरचे लोकं खूप गरीब असल्याने ते माझ्या सासरच्यांविरुद्ध काहीच कारवाई करु शकत नाही. सरकारने मला न्याय मिळून द्यावा नाहीतर मी आत्महत्या करेल.'

दरम्यान, तत्काळ तिहेरी तलाकशी संबंधीत विधेयकाला संसदेत मंजुरी मिळू न शकल्याने 10 जानेवारी रोजी मोदी सरकारने मोठा निर्णय घेत यासंबंधीच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी दिली. त्यामुळे तत्काळ तिहेरी तलाक देणे या अध्यादेशानुसार गुन्हा आहे. या गुन्हा अंतर्गत तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: marathi news man gives triple talaq to his wife over phone in uttar pradesh


संबंधित बातम्या

Saam TV Live