25 वर्षांची उधारी चुकवली.. 'तो' केनियाहून आला उधारी चुकवायला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019
  • केनियाच्या खासदारानं चुकवली 25 वर्षांपूर्वीची उधारी 
  • उधारी चुकवण्यासाठी आले खास औरंगादला
  • 200 रुपयांच्या मोबदल्यात व्याजासह दिले 19.200 रुपये

रिचर्ड न्यागका टोंगी,  केनियाचे खासदार आणि केनियाच्या संरक्षण-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय समितीचे उपाध्यक्ष.  ते कोणत्याही सरकारी कामानिमित्त औरंगाबादला आलेले नाहीत. तर  25 वर्षानंतर ते खास उधारी चुकती कऱण्यासाठी आले. तीही 200 रुपयांची. रिचर्ड न्यागका टोंगी यांनी 1995 मध्ये औरंगाबादच्या मौलाना आझाद एमबीए कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. याकाळात ते काशीनाथ गवळी यांच्या भाड्याच्या खोलीत राहिले त्या खोलीचे भाडं आणि गवळी यांच्या किराना दुकानाची ही उधारी होती. 

पाहा रिचर्ड न्यागका टोंगी यांची अनोखी कहाणी

 


संबंधित बातम्या

Saam TV Live