कार अपघातात राष्ट्रवादीचा पदाधिकारी ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

ढेबेवाडी (ता. पाटण) : दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. विशाल सुनील मोरे (वय 25) असे त्यांचे नाव आहे. कऱ्हाड ते ढेबवाडी रस्त्यावर मानेगाव (ता. पाटण) हद्दीतील पुलानजीक काल रात्री हा अपघात झाला.

विशाल कऱ्हाडहून तळमावलेच्या दिशेने येत होते. त्यावेळी बोलेरो कऱ्हाडच्या दिशेला निघाली होती. याचवेळी एस कॉर्नरवर आल्यानंतर विशाल यांच्या बुलेटला बोलेरोने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की बुलेटचे इंजिन तुटले. या धडकेत विशाल गंभीर जखमी झाले. त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: NCP office bearer Died in Manengaon accident

संबंधित बातम्या

Saam TV Live