भाजपचे हे आमदार ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर

भाजपचे हे आमदार ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर

मुंबई: महाराष्ट्रातील एक व्यक्ती हा देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरलाय. तो म्हणजे मंगलप्रभात लोढा. त्यांची एकूण संपत्ती 31,960 कोटी रुपयांवर पोहोचलीय. आणि या वर्षात त्यात 18 टक्क्यांनी वाढ झालीय. दरम्यान या स्पर्धेत डीएलएफचे राजीव सिंग आणि एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.़ॉ


हे आहेत टॉप 10 श्रीमंत बिल्डर

मंगल प्रभात लोढा लोढा डेव्हलपर्स ३१,९६०
राजीव सिंग 'डीएलएफ' २५,०८०
जितेंद्र विरवाणी एम्बॅसी समूह २४,७५०
डॉ. निरंजन हिरानंदानी हिरानंदानी समूह १७,०३०
चंद्रू रहेजा के.रहेजा १५,४८०
विकास ओबेरॉय ओबेरॉय रियल्टी १३,९१०
राजा बागमाने बागमाने डेव्हलपर्स ९,९६०
सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानी, सिंगापूर ९,७२०
सुभाष रुणवाल रुणवाल डेव्हलपर्स ७,१००
१० अजय पिरामल पिरामल रियल्टीज ६,५६०

ग्रोहे हुरुन इंडियातर्फे केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. 100 जणांच्या या सूचीतील सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत लोढा यांची मालमत्ता 12 टक्के आहे. 

बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील 100 मोठ्या व्यावसायिकांचं एकूण उत्पन्न 2 लाख 77 हजार कोटी रूपये इतकं आहे. या वर्षी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या 6 कंपन्यांनी 2 हजार कोटी रूपयांची तर अन्य 20 कंपन्यांची 1 हजार कोटी रूपयांची विक्री केली. तर लोढा कुटुंबीयांचे 31 मार्चपर्यंत एकूण ४० प्रकल्प सुरू होते. मंगलप्रभात लोढा हे भाजपाचे मुंबई अध्यक्षदेखील आहेत. गेल्या वर्षभरात लोढा कुटुंबीयांच्या एकूण उत्पन्नात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर राजीव सिंग याच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षभरात तब्बल 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Web Title - Mangalprabhat Lodha is the richest builder in the country

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com