कोकणातील आंबा व काजू  पिक धोक्यात येण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

कोकणात पावसाने उसंत घेतली आहे. तर, दुसरीकडे सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्री आणि सकाळच्या वेळात हीच स्थिती पाहायला मिळतेय.. त्यामुळे तळकोकणातील ही थंडीची चाहूल तर नव्हे ना असा प्रश्न पडला आहे. 

यंदा कोकणात समाधानकारक पाऊस झाला. सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनच्या परतीला सुरुवात होते.. आणि ऑक्टोबरपासून थंडीचा मोसम सुरू होतो.

मात्र, कोकणात सध्या पाऊस गायब झाल्याने आणि सकाळी सकाळी हजेरी लावणाऱ्या दाट धुक्यामुळे थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. एकीकडे दाट धुक्यासोबत येणारी थंडी अल्लाददायक वाटत असला. तरी पर्यावरणीय बदलाचा फटका याही हंगामात आंबा व काजू बागायतीवर बसण्याची भीती बागायतदारांना आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live