खावा आम्बो आपलोच असा..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

आंब्याचा हंगाम म्हटला की 'कोकणच्या राजा'ची चव चाखण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्रवासियांना मिळत असते. परंतु, परदेशात राहणाऱ्या भारतीय तसेच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अमेरिकेत आता पहिली आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६ मेट्रिक टन एवढा आंबा निर्यात झाला आहे. म्हणजेच, कोकणच्या राजाची अमेरिकावारी सुरु झाली आहे. 

नोकरी, कामानिमित्ताने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन तसेच भारतीय नागरिकांना ही चव चाखायला मिळावी यासाठी त्या त्या देशांच्या अटीनुसार आंबा निर्यात करण्याची यंत्रणा राज्य पणन मंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन देशांसह अन्य छोट्या-मोठ्या देशांमध्ये विविध जातीचे आंबे निर्यात करण्यात येतात. त्याकरिता पणन मंडळाने वाशी येथे विविध यंत्रणा कार्यान्वित केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live