माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना झेड प्लस सुरक्षा देणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) काढण्याचा निर्णय आज (सोमवार) सरकारकडून घेण्यात आला. आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) काढण्याचा निर्णय आज (सोमवार) सरकारकडून घेण्यात आला. आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची विशेष सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एसपीजी सुरक्षा देशातील फक्त चार जणांनाच दिली जाते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना ही सुरक्षा आहे. 

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुरक्षेचा आढावा घेतला जातो, त्यात मनमोहनसिंग यांना कोणताही धोका नसल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. आता मनमोहनसिंग यांना झेड प्लस ही सुरक्षा देण्यात येणार आहे.  

पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीतील सुमारे 3 हजार जवान कायम तैनात असतात. 1985 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी स्थापना कऱण्यात आली होती. त्यानंतर 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा देण्याचा निर्णय झाला.

Web Title: Manmohan Singhs Top Security SPG Cover Withdrawn Given CRPF Security


संबंधित बातम्या

Saam TV Live