न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज परतणार 

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज परतणार 

गोव्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असतानाच न्यूयॉर्कहून काल रात्री 11.30 वाजता (अमेरीकेतील प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात येण्यास निघाले आहेत. ते गोव्यात आज  सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान  मुंबईमार्गे दाखल होणार आहेत. ते मुंबईत आज दुपारी 3 वाजता पोचतील. 

मुख्यमंत्री न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना येथे राज्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये जातील, त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल अशी चर्चा होती मात्र त्यापुढे काही झालेले नाही.

भाजपच्या संपर्कात काँग्रेसचे आमदार तर काँग्रेसच्या संपर्कात भाजपचे आमदार असल्याचे दावे, प्रतिदावे दोन्ही बाजूकडून करण्यात आले. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे पर्व सुरु होते की काय अशी शंका वाटत असतानाच काल सायंकाळी मुख्यमंत्री गोव्यात येतील अशी माहिती समोर आली. मुख्यमंत्र्यांसोबत अमेरीकेत असलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केल्यावर रात्री 11.30 वाजताच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुख्यमंत्री भारताकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली.

त्यांच्या येण्यामुळे सरकार ठप्प झाल्याच्या, प्रशासन काम करत नसल्याच्या चर्चेला विराम मिळणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर दिल्लीला गेल्याची माहिती प्रसारीत झाल्याने काहीवेळ त्याची चर्चा झाली होती. मात्र भाजपमध्ये आधी पक्ष संघटनेसोबत चर्चा करण्याची पद्धत आहे. तशी चर्चा न झाल्याने सध्याची राजकीय चर्चा ही चर्चेच्या पातळीवरच असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र राजकीय चर्चेनुसार गणेश चतुर्थीनंतर राजकीय हालचाली पून्हा होण्याची शक्यता आहे.

Web Title: marathi news manohar parrikar back to india after treatment in newyork 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com