पर्रीकरांचे ‘ते’ दोन दिवस शेवटचेच ठरले 

पर्रीकरांचे ‘ते’ दोन दिवस शेवटचेच ठरले 

नागपूर - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मागील वर्षी जुलैमध्ये नागपूरला भेट दिली होती. त्यांची ही भेट नागपूरकरांसाठी अखेरचीच ठरली. संघाचे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे संत्रानगरीत त्यांचा वावर होता. केंद्रात सत्ता येण्यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी विदर्भात पर्यटन विकासाचाही मंत्र दिला होता. 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल गोव्यात निधन झाले. संरक्षणमंत्री असताना मागील वर्षी ११ जुलै रोजी ते नागपुरात आले होते. दोनदिवसीय दौऱ्यात त्यांनी येथील डिफेन्सला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवादही साधला. नागपूर भेटीनंतर मात्र त्यांना सप्टेंबरमध्येच दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सातत्याने आजाराशी लढा देत आज त्यांची प्राणज्योत मालवली. जुलैमधील त्यांची नागपूर भेट अखेरची ठरली. त्यापूर्वीही ते नागपुरात ते अनेकदा आले. 

नागपुरात फ्रेण्ड्‌स ऑफ भाजपतर्फे २४ मार्च २०१४ रोजी आयोजित प्रश्‍नोत्तराचा तास चांगलात रंगला होता. यावेळी त्यांनी गोव्याच्या प्रगतीबाबत बोलताना भ्रष्टाचार कुठल्याही राज्याच्या प्रगतीत बाधक असल्याचे सांगितले होते. यावेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी पर्यटनाला चालना देण्याचा कानमंत्रही दिला होता. पर्यटकांना योग्य सुविधा मिळाल्यास विदर्भाचा विकास शक्‍य असल्याचे ते म्हणाले. राजकीय नेते उच्चशिक्षित तसेच माणूस म्हणूनही संस्कारी असल्यास राज्याच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही, असेही त्यांनी या कार्यक्रमात सांगितले होते. याशिवाय ते २२ डिसेंबर २०१७ तसेच १७ मे २०१५ रोजीही नागपुरात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com