पुणे-मुंबई दरम्यान अनेक गाड्या 8 दिवसांसाठी रद्द; रेल्वे प्रवाशांचा होणार खोळंबा..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे : कर्जत ते लोणावळा या घाट भागामध्ये दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते मुंबई दरम्यान 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत काही गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गंद्दक एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व पुणे पनवेल पँसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. तर काही गाड्यांचा मार्ग बदल्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या काळात रेल्वे प्रवास करता येणार नाही.

पनवेल नान्देड हॉलिडे स्पेशल, नांदेड पनवेल या गाड्या पुणे ते पनवेल दरम्यान तर, हूबळी एक्स्प्रेस पुणे ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ-पुणे-भुसावळ ही दौंड-मनमाड मार्ग चालविण्यात येणार आहे.
 
WebTitle : marathi news many trains on the mumbai pune rout are cancelled for eight days

संबंधित बातम्या

Saam TV Live