खासदार खैरेंना मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत हुसकावून लावलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी कानडगावच्या (ता. गंगापूर) अठ्ठावीस वर्षीय तरुण काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांनी गोदावरीत उडी टाकून जीव दिला. आज (ता. 24) नातेवाईकांच्या अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कायगाव येथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांना संतप्त जवामाने धक्काबुक्की करून तेथून निघून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. 

सोमवारी मराठा आरक्षणासाठी एकाला जीव गमवावा लागला, याच रागातून आज अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनीधींना येऊ द्यायचे नाही, असे जमावाने ठरवले होते. त्याप्रमाणे खैरे व झांबड यांनाही तेथून निघून जाण्यास सांगितल्यावर त्यांनी जाण्यास नकार दिला व ते तिथेच थांबून राहिले. त्यामुळे जवामाने संतप्त होऊन, त्यांना धक्काबुक्की करून तेथून घालवून दिले. त्यानंतर आमदार-खासदारांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. 

अंत्यसंस्काराच्या ठिकाणी 150 ते 175 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. पण जमाव अत्यंत संतप्त असल्याने पोलिसांना नियंत्रण करण्यास अवघड गेले. काल जिथे काकासाहेबांनी नदीत उडी मारली तिथे आजही ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणासह मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आता मराठा समाजामने केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live