मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात जेलभरो आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे... गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि आता जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर 11 वाजेपासून सार्वत्रिक जेलभरो आंदोलनाला सुरुवात होईल.

मराठा समाजाला आमचं सरकारच आरक्षण देईल: 
दरम्यान, मराठा समाजाला आमचं सरकारच आरक्षण देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. आरक्षणाचा कायदा आमच्या सरकारनं केला असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईत आयोजित छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते 

संबंधित बातम्या

Saam TV Live