मराठा समाजाचा पुन्हा एल्गार; 9 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा 

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद
बुधवार, 31 जुलै 2019

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षभरापासून लाखोंचे मोर्चे काढणारा मराठा समाज आता पुन्हा रस्त्यावर उतरणारय. इतके मोर्चे काढल्यानंतरही राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं पुन्हा राज्यभर आंदोलन उभं करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं कंबर कसलीय. येत्या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी धरणं आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. 

ज्या समाजबांधवांनी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी बलिदान दिलं, अशांच्या कुटूंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात यावी, तसंच दिलेल्या आश्वासनानुसार घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घेण्यात यावं. 

या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणारंय. याबातचं निवेदनही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आलंय. राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय. 

कोपर्डीप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलनं करण्यात आली त्यात 43 मराठा बांधवांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मराठा समाजानं आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live