मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं

अतुल पाटील
शुक्रवार, 16 मार्च 2018

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्व्हेचं काम दिलं म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सराटे यांना काळं फासलं. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक असतानाही त्यांना काळं फासण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. औरंगाबाद इथल्या सुभेदारी विश्रामगृह इथं राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आरक्षणासंदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडावर शाई फेकून काळं फासलं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

दुसरीकडे सराटे हे आरक्षणाबाबत मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. ते संघाचे हस्तक असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाच्या एका गटानं केली. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांची 'शिवाजी' नावाची संस्था असून या संस्थेला मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचं काम देण्यात आलंय आणि त्यावरुनच मराठा क्रांती मोर्चातील एका गटाचा विरोध होतोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live