मराठा तरूणांनी तोडफोड केलीच नाही; मराठा क्रांती मोर्चाचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. औरंगाबादमध्ये वाळूंज औद्योगित वसाहतीत काही उद्योगांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. ५० ते ६० मोठ्या आणि १० ते १५ लघू, मध्यम उद्योगांवर हल्ले करण्यात आले.

त्यामुळं भविष्यात औरंगाबादमध्ये उद्योग आणायचे का, उद्योग इथं वाढवायचे का, असा उद्विग्न सवाल उद्योजकांनी केलाय. (वाळूज एमआयडीसीत उद्योगांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांनंतर उद्योजक संघटनांनी रात्री तातडीने पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी सीएमआयए, मासिआ, एनआयपीएम या संघटनांसह काही उद्योजकांचीही उपस्थिती होती.
दुसरीकडे वाळूंज MIDC तोडफोडीत मराठा मोर्चातील आंदोलक सहभागी नव्हते असा दावा मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय. तोडफोडीप्रकरणी CID चौकशीची मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलीय. 

वाळूजसह अन्य काही ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून, गुंतवणुकीवर त्याचे मोठे परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय. ही राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं नक्कीच गंभीर बाब आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live