टायर जाळून मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन सुरू.. बार्शी सोलापूर वाहतूक ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूरात बार्शी सोलापूर राज्यमार्गावर पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा भडका उडालाय. राज्यमार्गावर टायर जाळून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आलंय. बार्शी तालुक्यातील पानगावात हा प्रकार घडल्याचं समजतंय. यामुळे बार्शी सोलापूर वाहतूक ठप्प झाली असून मराठा आंदोलक आक्रमक झालेत. दरम्यान सकल मराठा समाजाची आज बार्शी शहर आणि तालुका बंदची हाक दिलीय. 

दरम्यान,  आज मराठा समाजाने सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे. आरक्षणासाठी आज कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असला तरी या बंदमधून रुग्णालय, मेडिकल स्टोअर्ससह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.या बंदमुळे आज जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉलेजेसनाही सुट्टी देण्यात आली आहे

संबंधित बातम्या

Saam TV Live