आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासारखा, वादावर येत्या दोन ते तीन दिवसात पडदा पडेल - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राजकीय हालचाली गतिमान झाल्यात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, या मागणीसाठी राणे आग्रही आहेत. मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून मोठा असंतोष आहे. हे लक्षात घेता वेळीच सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राणेंनी केलीय.

आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासारखा आहे असं सांगून या वादावर येत्या दोन ते तीन दिवसात पडदा पडेल असं राणेंनी म्हंटलंय.   

संबंधित बातम्या

Saam TV Live