येत्या शिवजयंतीपासून मराठा समाजाचं असहकार आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या शिवजयंतीपासून असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. आज औरंगाबादमध्ये मराठा समाजाकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडं सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मराठा समाजानं केलाय. मराठा समाजाच्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवजयंतीपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर असहकार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या शिवजयंतीपासून असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. आज औरंगाबादमध्ये मराठा समाजाकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडं सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मराठा समाजानं केलाय. मराठा समाजाच्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवजयंतीपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर असहकार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अहसकार आंदोलनाच्या काळात मराठा समाज कोणताही कर, वीज बिल, बस आणि रेल्वे भाडे भरणार नाही असं जाहीर करण्यात आलंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live