आषाढीची महापूजा करू देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आता अधिक आक्रमक झालाय. आधी मूक मोर्चा काढणाऱ्या मराठा समाजानं आता गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्धार तुळजापुरात केलाय. याच आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना आषाढीची शासकीय महापूजा न करू देण्याचा निर्धार मराठा समाजानं केलाय.

राज्यभरातून येणाऱ्या दिंड्यांमध्ये मराठा समाजाचे 40 हजार कार्यकर्ते सहभागी झालेत. हे कार्य़कर्ते आषाढी वारीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेत विघ्न आणण्याची शक्यता आहे. भाजपनं यावर सावध भूमिका घेतलीय. विठुमाऊलीच्या पूजेत तरी राजकारण आणू नये असा टोला भाजपनं लगावलाय.

आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुरात लाखो वारकरी असतात. जर मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्य़ांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा उधळण्याचा प्रयत्न केला तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live