मराठा आंदोलकांनी अग्निशामक दलाची गाडी पेटवली 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

कायगांव टोका येथील गोदावरी नदीपात्रात सोमवारी (ता.23) काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्तेनंतर त्यांच्या पार्थीवावर मंगळवारी (ता. 24) अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार होताच संतप्त आंदोलकांनी अग्निशामक दलाच्या गाडीसह अन्य एक वाहन पेटवून दिले. यावेळी आंदोलक विरुद्ध पोलिस असा सामना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

औरंगाबाद - नगर रस्त्यावर असलेल्या कायगाव टोका येथे काकासाहेब यांच्यावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार झाल्यानंतर आंदोलक आपल्या मागण्यांबाबत पुन्हा आक्रमक झाले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत नगर-पुणे महामार्ग अडवून ठेवला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचवेळी पोलीस आणि आंदोलकात धुमश्‍चक्री सुरू झाली. यावेळी आंदोलकांनी अग्नीशमन दलाची गाडी उलटवून पेटवून दिल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live