आरक्षणासाठी मराठा समाज आणखी आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

मराठा समाजाच्या मूक मोर्चानंतर आता राज्यभरात ठोक मोर्चा काढून आरक्षणाबरोबरच इतर मागण्या मांडल्या जाणार आहेत. याची पहिली ठिणगी तुळजापूर इथं पडली असून आज बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेच्या परळीत इथं ठोक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्यातील विविध भागातून मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत. दुपारी निघालेला मोर्चा अद्यापही तहसील कार्यालयाबाहेर असून, मराठा समाज बांधवांनी परळी तहसील बाहेर ठिय्या दिलाय. जो पर्यंत मागण्यांना लेखी स्वरूपात उत्तर मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live