मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ९ ऑगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनावेळी हिंसाचार होऊ शकतो अशी माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली आहे. दिल्लीहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १६ तुकड्यांची कुमक मागवली असल्याचे राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सांगितले.

पोलीस दलाकडे राखीव राज्य पोलिसांच्या तुकड्या आहेत, पण राज्यभरात एकाच वेळी, एकाच दिवशी आंदोलन झाले तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी या तुकडय़ा अपुऱया असल्यामुळे आम्ही केंद्राकडे पत्र लिहून अतिरिक्त तुकडय़ांची मागणी केली आहे, असे पोरवाल यांनी सांगितले. एका तुकडीत ८० ते १५० सशस्त्र जवान आणि महिला असतात.

संबंधित बातम्या

Saam TV Live