मराठा आरक्षण आंदोलनाची मुख्यमंत्र्यांना धास्ती ? मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सांगली दौरा रद्द.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा आरक्षण साठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. याची धास्ती घेत मुख्यमंत्री यांनी उद्याचा सांगली दौरा रद्द केलाय. असं असलं तरी 30 तारखेलाही मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना सांगलीमध्ये फिरकू देणार नाही, प्रसंगी त्यांच्या गाड्या आडवू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे महेश खराडे यांनी दिला आहे. 

कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्‍यात पाय पाय ठवू देणार नाही 
 
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शुक्रवारचा सांगली दौरा रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सांगली महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्‍यात पाय ठेवू द्यायचा नाही, असा ठराव मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला होता. या ठरावामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

WebTitle : marathi news maratha reservation agitation CM sangali tour cancelled 

संबंधित बातम्या

Saam TV Live