आम्ही त्यांच्या एवढा अभ्यास करू शकणार नाही, कारण ते वकील आहेत !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मुंबई : "राज्यसरकारने मागास आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा. धनगर समाजासाठी 'टीस'ने केलेल्या शिफारशी केंद्राकडे पाठविण्यापूर्वी सभागृहासमोर आणा. तुम्ही अभ्यास करताय, आम्हालाही करू द्या. आम्ही त्यांच्या एवढा अभ्यास करू शकणार नाही, कारण ते वकील आहेत,'' असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लगावला.

विधानसभेमध्ये मागास आयागोचा अहवाल पटलावर ठेवावा अशी आग्रही मागणी करताना अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, " मागास आयोगाच्या अहवालात काय आहे? हे आम्हाला कळू द्या. राज्यातील जनतेला कळू द्या. सरकार अहवाल जाहीर करीत नसल्याने या अहवालात आहे काय? "

काही लपवालपवी चालू आहे का? असा संभ्रम निर्माण होतो. टिसचा अहवाल मागितला तर हे म्हणतात आम्ही अभ्यास  करतोय . करा ना तुम्ही अभ्यास पण आम्हालाही करू द्या . आम्ही त्यांच्या एवढा अभ्यास करू शकणार नाही, कारण ते वकील आहेत . आम्ही थोडा कमी करू . पण आमच्याकडे अनुभव आहे . ''

या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस अहवाल पटलावर ठेवले नाही म्हणून हे सांगतात. पण तेंव्हाची परिस्थिती वेगळी आहे, आताची वेगळी आहे. असे सांगून अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी अभूतपूर्व असे मोर्चे निघाले. चाळीसवर युवकांचे जीव गेले. सीएमसाहेब आम्ही कोणी अडथळा आणत नाही, पण तुम्ही अहवाल पटलावर ठेवा. धनगर की धनगड याबाबत 'टीस'ने काय अहवाल दिला, हे कळू द्या. सर्वांना विश्‍वासात घेऊनच याबाबत केंद्राकडे शिफारस पाठवावी.''

"मुस्लीम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याबाबत न्यायालयाने देखील मनाई केलेली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला हे आरक्षण द्या. मुख्यमंत्र्यांनी तुटेपर्यंत ताणू नये. सामंजस्याची भूमिका घ्यावी. सर्वांना बरोबर घ्यावे. मराठा समाजाच्या युवकांची धरपकड थांबवावी,'' असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live