मागासवर्गीय आयोगाच्या अहवालनंतर मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन बोलावण्यात येणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधानसभेत पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालनंतर हे अधिवेशन बोलावण्यात येणार आहे.

शिवाय आंदोलकांवरील सौम्य गुन्हेही मागे घेण्यात येणार असल्याचं बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.  

सरकारने बोलावलेली बैठक म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण
मराठा आरक्षणाबाबत सरकारने बोलावलेली बैठक म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय. मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सोमवारी होणारंय.

या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मागासवर्गीय आयोगाची भेट घेणारंयत. त्यानंतरच पुढची दिशा स्पष्ट करू, असं विरोधकांनी म्हटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live