मराठा आरक्षण आणि SEBC जात प्रमाणपत्राबद्दलची महत्त्वाची बातमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

राज्यातल्या मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशांत 16 टक्के आरक्षणाबाबत उद्या हायकोर्टात निकाल दिला जाणाराय. याबाबतचा मराठा आरक्षण कायदा घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या वैध आहे की नाही, याबाबत हा निकाल दिला जाणाराय. न्यायमूर्ती रणजीत मोरे आमि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून हा निकाल दिला जाणाराय.

दरम्यान, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिलीय. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live