MPSC च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. 

पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. 

राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गात नुकतेच 16 टक्के आरक्षण लागू केले आहे. लोकसेवा आयोगाच्या मेगाभरतीतही मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता आयोगाने पदभरतीत सामाजिक आणि आर्थिक मागसवर्गात राखीव जागा नमूद केल्या आहेत. आयोगामार्फत "राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019' 17 फेब्रुवारीला राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध विभागांतर्गत एकूण 342 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. 

"सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार लोकसेवा आयोगाने केवळ पदांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत.'' 
- सुनील औताडे, उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

"मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा फायदा मुलींपेक्षा मुलांना अधिक होणार आहे. मुलांना राखीव जागा आणि खुल्या गटातूनही पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र मराठा समाजातील मुलींना केवळ राखीव जागांवरूनच अर्ज करता येणार आहे.'' 
- किरण निंभोरे, विद्यार्थी 

"राज्य सेवा आयोगातील मुलींच्या समांतर आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा समाजाला आयोगाच्या पदभरतीत राखीव जागा दिल्या असल्या तरीही त्याचा फारसा फायदा मुलींना होणार नाही. मराठा समाजातील मुलींना केवळ राखीव जागेसाठी अर्ज करता येईल. खरंतर याबाबत मुलींमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काढणे अपेक्षित आहे.'' 
- सुरेखा भणगे, विद्यार्थिनी 

पद : एकूण जागा : सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी जागा 
उपजिल्हाधिकारी : 40 : 4 
पोलिस उप अधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त : 34 : 3 
सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) :16 : 1 
तहसीलदार : 77 : 6 
उपशिक्षणाधिकारी (राज्य शिक्षण सेवा) : 25 : 2 
कक्ष अधिकारी : 16 : 1 
सहायक गट विकास : 11 : 1 
नायब तहसीलदार : 113 : 8 


संबंधित बातम्या

Saam TV Live