मराठा आरक्षण विधेयक बुधवारी मंजूर होणार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक या आठवड्यात मंजूर केले जाणार आहे. सूत्रानुसार येत्या बुधवारी मागास आयोगाच्या शिफारशी सभागृहात मांडल्या जातील.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक या आठवड्यात मंजूर केले जाणार आहे. सूत्रानुसार येत्या बुधवारी मागास आयोगाच्या शिफारशी सभागृहात मांडल्या जातील.

मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्‍के असल्याने आरक्षणाचे प्रमाण १६ टक्‍के असेल, असे मानले जात आहे. मात्र मराठा समाजात कुणबी समाजाचा समावेश करण्यात आल्याने हा आकडा अयोग्य असल्याचे सांगणारा मोठा वर्ग आहे. आरक्षणाचे प्रमाण वाढवून देण्यात येणार असले तरी हा आकडा दहा टक्‍के असेल, असेही काही नमूद करत आहेत. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात १६ टक्‍के आरक्षण दिले असल्याने आता ते प्रमाण कमी करणे योग्य ठरणार नाही, असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live