मराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून, येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिले.

नगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून, येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. खऱ्या अर्थाने वारकरी व शेतकऱ्यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. मात्र, आम्ही 4 वर्षांच्या कालावधीत शेतकऱयांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतकऱयांच्या पाठिशी आमचे सरकार आहे''.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी सांगितले.

आजच डाउनलोड करा साम Tv मोबाईल APP : 

https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.saamtv&hl=en

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live