मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची धरपकड..!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची ‘मराठा संवाद यात्रा’ आज मुंबईत धडकणार असल्याने पोलिस प्रशासनाने थेट अटकसत्र सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकाना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कोल्हापूरमधून इंद्रजित सावंत यांच्यासह काही प्रमुख समन्वयकांना अटक केल्याने मराठा समाजात सरकार विरोधात रोष सुरू झाला आहे.

आज पहाटे मुंबईत दाखल झालेले अहमदनगरचे समन्वयक संजीव भोर-पाटील, सोलापूरचे माऊली पवार, नवी मुंबईचे अंकुश कदम यांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पुण्यात राजेंद्र कोंढरे तर नाशिक मधे करण गायकर यांना पोलिसांनी अटक केली. 

ठाणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नवी मुंबई व मुंबईतील प्रमुख समन्वयांकाना पोलिसांनी स्थानबध्द करत आझाद मैदानात जाण्यापासून रोखले आहे. काही मराठा आंदोलक गनिमी कावा करत आझाद मैदानात पोहचले असून त्यांनी आंदोलन सुरू केल्याची घोषणा केली. 

सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 
दरम्यान, विधानसभेच्या पायर्यावर विरोधकांनी मराठा आंदोलकांवरील दडपशाहीचा विरोध करत सरकार विरोधात संताप व्यक्त केला. 

सरकारची पोलिस कारवाई म्हणजे मराठा आंदोलन दडपण्याची हूकुमशाही असल्याची टिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.  राज्यभरातून अनेक आंदोलनकर्ते मुंबईकडे निघाले असून त्यांना रस्त्यावरच अडवण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live