मराठा विद्यार्थ्यांना दिलासा; शिक्षणात मराठा आरक्षण यंदा पासूनच!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करु नये, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण शिक्षण कोटा लागू झाला असून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अॅड. मुकेश वशी यांच्या माफत याचिका केली होती. आरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षांपासून मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास गटात आरक्षण द्यायला हवे, चालू वर्षी यावर जागा मंजूर करु नये, असा दावा वशी यांनी केला. मात्र प्रवेश प्रक्रिया मागील वर्षी औनलाईनवर सुरु झाली आहे, प्रवेश देतानाच आरक्षण लागू होते, असे सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ विजय थोरात यांनी खंडपीठाला सांगितले. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरविला. शिक्षण क्षेत्रात बारा टक्के आरक्षण देण्याचे आदेश हायकोर्ट ने यापूर्वी दिले आहेत. सरकारने सोळा टक्के जागा ठेवल्या होत्या

संबंधित बातम्या

Saam TV Live