मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक, सरकारची धावाधाव

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांकडून बंद पुकारण्यात आला आहे,  सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमा झालेत.

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर सरकारची धावाधाव सुरू झालीय. आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झालीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी सरकारमार्फत केली जातीय. त्याच अनुषंघाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीय. या बैठकीत आरक्षणासंदर्भात विधीतज्ज्ञांसोबत चर्चा केली जाणारंय. 

सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांकडून बंद पुकारण्यात आला आहे,  सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमा झालेत.

पाहा, आक्रमक मराठा समाजाचा एल्गार

पोलिसांनी यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतलंय. सोलापूर जिल्ह्यातील  माढ्यामध्ये आज सकाळीच मराठा समाजातील तरूणांनी आंदोलन केलं. माढा शहरात टायर पेटवून आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केलाय. तर आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  एसटीनं सोलापूर जिल्ह्यात प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. पंढरपूर आगारातून आंतर जिल्हा आणि आंतर राज्य होणाऱ्या 1600 फेऱ्या आज रद्द केल्यात.

कोल्हापूरात मराठा क्रांती मोर्चाने महाविकास आघाडीचं श्राद्ध घातलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आंदोलन करत आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलिस भरती थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाला बारा दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून काहीच हालचाली नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलं. महाविकास आघाडीचे बारावं घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी काही क्षणातच ताब्यात घेतलं. यावेळी पोलिस आंदोलन दडपत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live