"आधी आरक्षण, मगच नोकर भरती " मराठ्यांची आरक्षणासाठी राज्यभर आक्रमक आंदोलनं

साम टीव्ही
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

येत्या दहा दिवसांमध्ये राज्यभर कशापद्धतीने आंदोलनं केली जातील याची रूपरेषा ठरवली जाणार असल्याचं ते म्हणालेत. आधी आरक्षण, मगच नोकर भरती ही टॅग लाईन या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलकांना देण्यात आलीय. अगोदर मराठा आरक्षण मूक मोर्चा झाला, त्यानंतर मराठा आरक्षण ठोक मोर्चा झाला.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठा आरक्षण आंदोलकांकडून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण हक्क परिषद उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथे पार पडली. आजपासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्याची घोषणा मराठा आरक्षण राज्य समन्वयक आबासाहेब पाटलांनी केलीय. 

येत्या दहा दिवसांमध्ये राज्यभर कशापद्धतीने आंदोलनं केली जातील याची रूपरेषा ठरवली जाणार असल्याचं ते म्हणालेत. आधी आरक्षण, मगच नोकर भरती ही टॅग लाईन या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलकांना देण्यात आलीय. अगोदर मराठा आरक्षण मूक मोर्चा झाला, त्यानंतर मराठा आरक्षण ठोक मोर्चा झाला. आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा आंदोलन 2020 या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झाल्याची घोषणा केलीय.

 

वाचा, कसा असेल मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रवास?

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारमार्फत आज काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय. या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही दिलासादायक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

पाहा या आंदोलनाचा सविस्तर व्हिडिओ -

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम शहरात आज मराठा क्रांती मोर्च्याकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकारनं मराठा समाजाच्या बाजूनं भक्कमपणे उभे रहावं नाहीतर राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक, सरकारची धावाधाव

सांगली सखल मराठा क्रांती मोर्चाकडून भाजप आमदारांच्या दारात हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुधाकर खाडे यांच्या दारात हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live