मराठा आरक्षणानंतर 4 हजार पदांसाठी भरती सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मराठा समाजाला सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्यानंतर, राज्य सरकारनं आता 4 हजार पदांसाठी भरती सुरू केलीय. राज्य सरकारनं तब्बल 72 हजार पदांसाठी मेगाभरती सुरू केलीय. त्यातील पहिल्या टप्प्यात 34 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. तर आत्तापर्यंत विविध विभागांत चार हजार पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या निर्देशांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात सध्या तरी कोणतीही अडचण नाही. मात्र भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना नियुक्ती कधीपासून द्यायची, यासंदर्भात 23 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

WebTitle : marathi news maratha reservation recruitment for four thousand jobs starts 

संबंधित बातम्या

Saam TV Live