मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांची फडणवीस सरकारला सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांची फडणवीस सरकारला सूचना.. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या आगीत तेल ओतलं - शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका 

कोल्हापूरात शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या आगीत तेल काम केलं. साप सोडल्याच्या विधानाने आंदोलक आक्रमक झाले आणि राज्यातील हे अस्वस्थेच वातावरण राज्याच्या हिताचं नाही.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं त्वरीत सोडवावा अशा शब्दात पवारांनी सरकारला धारेवर धरलंय. घटनादुरूस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची गरज असून विरोधकांना एकत्र येण्याची विनंती करण्यास आपण तयार असल्याचंही पवारांनी म्हंटलंय.

त्याचबरोबर कायदेशीर अडचणींना पर्याय आहेत. घटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली ती दुरुस्ती संसदेत मांडली तर मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते. संसदेत ठराव करताना विरोधी पक्षांची मदत लागली तर त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे असंही त्यांनी म्हंटलंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live