मराठा आरक्षण मुद्यावरून सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसंच शिवसेना यांच्या महत्त्वाच्या बैठका आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी तर काँग्रेस आमदारांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थांनी बैठक होणार आहे. बैठकीनंतर पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल आणि राज्य मागास आयोगाची भेट घेतील.

तर, दुसरीकडे आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. मात्र या बैठकीला आलेल्या समन्वयकांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ही नावं गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.   

संबंधित बातम्या

Saam TV Live