मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज 'सोलापूर' बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चांनी राज्यात उग्ररुप धारण केलंय. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांनी आज सोलापूर बंद पुकारलाय. महाराष्ट्रात पेटलेले आंदोलन पाहता सोलापूर बंदची धग चिंता वाढवणारीच आहे.

सोलापूर शहरातील अनेक व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.  मराठा समाजाने जीवनावश्यक सेवा बंदमधून वगळल्या असल्याने दिलासा आहे.

मराठा आरक्षणाच्या बंदमुळे एसटी सेवा देखील बंदच राहणार आहे. दरम्यान, ज्याठिकाणी पोलिस बंदोबस्त असेल त्याचठिकाणी एसटी सेवा देण्यात येणार आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिलीय. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारातील एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर काही एसटींची संतप्त आंदोलकांनी तोडफोड केलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live