ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यात शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढून मराठा समाज सरकारपर्यंत  आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. 

क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र बंद पाळण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे. बंदऐवजी ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असं मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ठाणे आणि नवी मुंबईतील दुकानं, आस्थापनं सुरू राहतील.

संबंधित बातम्या

Saam TV Live