सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सकल मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर समाजबांधवांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाकडून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात झालीय. कोल्हापूरमधून या दौऱ्याची सुरुवात झालीय. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. पण ५८ मूक मोर्चे काढूनही समाजाच्या पदरात काहीच ठोस असं पडलेलं नाही. सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळंच आता राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

चळवळी आणि आंदोलनातून अनेक राजकीय पक्षांचा उदय झालाय. याच पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live