"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पण आपुल्या घरीच हाल सोसते मराठी.." 

जयराम पुरी
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पण आपुल्या घरीच हाल सोसते मराठी.." या सुरेश भटांच्या ओळी कुसुमाग्रजांच्या बाबतीत खऱ्या ठरल्या. कुसुमाग्रजांच्या नाशकातील निवासस्थानी सकाळपासून शुकशुकाट असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे एकीकडे राज्यभरात मराठीदिन उत्साहात साजरी केली जात असताना दुसरीकडे ज्यांच्या नावामुळे मराठी दिन आपण साजरा करतो, त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे मराठी दिनाच्या खऱ्या नटसम्राटाच्या अनास्थेमुळे मराठी मनं हळहळून गेली आहेत. महापौरांनीही अभिवादनाची वेळ बदल्यानं कुसुमाग्रजांच्या घरी शुकशुकाट पाहायला मिळाला.

रिपोर्ट पाहा : 

संबंधित बातम्या

Saam TV Live