मराठमोळ्या गवांदेंचा सातासमुद्रापार झेंडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रातील चुकांवर नेहमी आपल्या लिखाणाद्वारे बोट ठेवणारे प्रसिद्ध डॉक्‍टर आणि लेखक अतुल गवांदे यांच्या रूपाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऍमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या जगातील दिग्गज कंपन्यांच्या भागिदारीतून सुरू होणाऱ्या नव्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मराठमोळ्या गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सदर कंपन्या यानिमित्ताने आरोग्य क्षेत्रात पदार्पण करीत असून, आज संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नव्या कंपनीचे कार्यालय अमेरिकेतील बोस्टन शहरात असणार आहे. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न बाळगता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

गवांदे हे एक एंडोक्राईन सर्जन आहेत. सध्या ते ब्रिगहॅममध्ये महिलांसाठीच्या रुग्णालयात कार्यरत असून, ते हॉर्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापकाचे कामही करतात. त्यांनी 2014 मध्ये लिहिलेले 'बीइंग मोर्टल: मेडिसिन अँड व्हॉट मॅटर्स इन द एंड' हे पुस्तक चांगलेच गाजले होते. 

या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या उपचारांसाठी होणारा खर्चही अवाक्‍यात येईल, असा विश्वास आम्हाला आहे. या दृष्टिकोनातूनच जेफ बेजॉस (ऍमेझॉन), जेमी डिमॉन (जेपी मॉर्गन) आणि मी गवांदे यांची निवड केली असून, ते त्यांचे काम अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडतील. 
- वॉरेन बफेट, बर्कशायर कंपनीचे चेअरमन 

संबंधित बातम्या

Saam TV Live