मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी यांची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी यांची निवड झाली असून त्यांनी प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांचा पराभव केला आहे. कांबळी यांना 34 तर कोल्हे यांना 26 मते पडली आहेत. 

परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी दोन जागा निवडायच्या होत्या, त्यामध्ये एका जागेवर गिरीश ओक यांची निवड झाली, तर दुसऱ्या जागेसाठी भाऊसाहेब भोईर आणि नरेश गडेकर यांच्यात चुरशीची लढत झाली या दोघांना 30 अशी समान मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली, चिठ्ठीतून गडेकर यांचे नाव आल्याने दुसऱ्या उपाध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली. 

कार्यवाहपदासाठी विजय कदम आणि शरद पोंक्षें यांच्यात लढत होऊन त्यात पोंक्षे यांचा विजय झाला. परिषदेच्या या निवडणुकीत एकूण कांबळी गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. कोल्हे यांचा पराभव हा अभिनेते मोहन जोशी गटासाठी धक्का आहे. कोल्हे यांचा विजय होईल अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती त्याचबरोबर ते शिवसेनेचे नेते असल्याने त्यांना त्या पक्षाचीही मदत मिळेल असा अंदाज होता पण तसे घडले नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live