उत्साह, आनंद, जल्लोष आणि दिमाखदार सोहळ्यातून संपूर्ण राज्यभरात नववर्षाचं स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रत्येक मराठी मन नववर्षाचं आनंदानं, उत्साहानं आणि जल्लोषात स्वागत करण्यामध्ये दंग झालंय. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल यांसह मोठ्या आनंदात आणि उत्साहात हिंदू नववर्षाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळाली. मुंबईच्या गिरगावात नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा मुख्य आकर्षण असतात. यंदाही या शोभायात्रेनिमित्त चित्ररथ आणि बाईक रॅली काढण्यात आल्या.

संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रत्येक मराठी मन नववर्षाचं आनंदानं, उत्साहानं आणि जल्लोषात स्वागत करण्यामध्ये दंग झालंय. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल यांसह मोठ्या आनंदात आणि उत्साहात हिंदू नववर्षाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळाली. मुंबईच्या गिरगावात नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा मुख्य आकर्षण असतात. यंदाही या शोभायात्रेनिमित्त चित्ररथ आणि बाईक रॅली काढण्यात आल्या. तिकडे सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतही मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आली होती. दरम्यान नाशिकसह नागपूर अमरावतीमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. उत्साह, आनंद, जल्लोष आणि दिमाखदार सोहळ्यातून संपूर्ण राज्यभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live